जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील अल्पसंख्यांक समाजाच्या विविध मागण्यांसाठी बुधवार ९ मार्च रोजी दुपारी महापालिकेत महापौर जयश्री महाजन यांना अल्पसंख्याक शिष्टमंडळाने भेट घेवून निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “जळगाव महापालिकेत शिवसेना ही अल्पमतात असल्याने अल्पसंख्यांक समाजाचे काही ठराव होऊ न शकल्याने जळगाव शहरातील अल्पसंख्यांक समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्रित येऊन मानियार बिरदारीचे अध्यक्ष फारूक शेख यांच्या नेतृत्वात महापौर जयश्री महाजन यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्या साठी साकडे घातले.
यात भंगार बाजाराचा ठराव कायम करून ११२ कुटुंबीयांना रस्त्यावर आणू नका व त्यांना रोजगार उपलब्ध राहू द्या, अजिंठा चौका लगत असलेल्या मनपा प्रवेशद्वाराला भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम आझाद नाव त्वरित देण्यात यावे, अक्सा नगर ममता हॉस्पिटल जवळ प्रवेश द्वाराला श्रीमती मेहरुन्निसा गेट म्हणून मान्यता देण्यात यावी, जळगाव खान्देशचे स्वातंत्र्य सेनानी व खानदेश गांधी म्हणून नावाजलेले मीर शुक्रल्ला यांचे नाव जळगाव शहरातील उद्यानाला अथवा एखाद्या महत्त्वाच्या भागाला देऊन त्यांचे नाव जपण्यात यावे.” यासह इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, ईदगाह ट्रस्टचे सहसचिव अनिस शाह, हुसैनी सेना अध्यक्ष फिरोज शेख, शिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान, नुरी फाऊंडेशनचे नाजीम सुपडू शेख, लकी फाऊंडेशनचे सईद शेख ,मोहम्मद इमरान व खलील शेख, मरकज फाऊंडेशनचे रफिक शेख व पोलीस बॉईज क्लबचे समीर रईस यांची उपस्थिती होती.