पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठ येथील मेनरोड वरील घराजवळील पाइपलाइनची गळती बंद करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे.
पेठ येथील मेनरोड वरील सुहासिनी वसंत जोशी या नावाने असलेले घराजवळ पहूर पेठ ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गेल्या अनेक दिवसापासून लीक झाले असून गेल्या दोन महिन्यांपासून सतत पाणी गळती होत आहे. यामुळे आमचे घरात सदर पाणी जिरत असून घराला धोका निर्माण झाला आहे तसेच आजूबाजूला राहणारे यांचे घरात पाणी मुरत आहे यासंदर्भात पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत तिला दिनांक 25- 8 -2021 रोजी पहूर पेठ येथील जयंत मुकुंद जोशी यांनी विनंती अर्ज केला होता अर्ज देऊन तब्बल जवळपास दिड महिना उलटला असला तरी अद्यापही ग्रामपंचायतीने या कडे लक्ष न दिल्याने मेन रोड वरील राहणाऱ्या लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरी ग्रामपंचायतीने अथवा संबंधित ग्राम विकास अधिकारी सरपंच यांनी याकडे लक्ष देऊन पाइपलाइनची गळती बंद करण्यात यावी तसेच वेळीच लक्ष देऊन सदर पाईपलाईन दुरुस्त करावी व भविष्यात आमच्यासह घराचे होणारे नुकसान तसेच पाण्याचा होणारा सततचा अपव्यय थांबावा अशी विनंती पहूर पेठ येथील नागरिकांनी केली आहे.
एकीकडे विकास कामे तर दुसरीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे गावात विविध ठिकाणी भूमिगत गटारी तसेच फ्लेवर ब्लॉगचे रस्ते, सामुदायिक सभागृह तर गावात मुतारी असे विविध विकास विकास कामे आज पूर्ण झाले असले तरी काही भागात मात्र ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पहूर पेठ येथील मेनरोड वरील पाईपलाईन गेल्या दोन महिन्यांपासून तर संतोषी माता नगर येथे माहोरे आप्पा यांच्या घराजवळ तर तब्बल एक ते दीड वर्षांपासुन पाईपलाईन ची गळती होत आहे. तर तेही पाईपलाईन ची गळती लवकरात लवकर ग्रामपंचायतीने पाईपलाईन ची दुरूस्ती करून पाणी गळती बंद करावी अशी विनंती संतोषी माता नगरातील रहिवाशांनी केली आहे.