अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर ते सोनगीर अमळनेर ते तांदळी व्हाया शहापूर बस सेवा पुन्हा सुरु करावी, अशी मागणी भाजपतर्फे आगार प्रमुखांना निवदेनाव्दारे नुकतीच करण्यात आली आहे.
दरम्यान, सणासुदीत अमळनेर ते सोनगीर अमळनेर ते तांदळी वाया शहापूर बस सेवा बंद असल्याने तालुक्यातील त्या मार्गाच्या सर्व गावातील नागरिकांना अमळनेर येताना खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. खाजगी वाहने अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याने नागरिकांना त्या गोष्टीचा त्रास होऊ लागला. यासंदर्भात भाजपतर्फे आगारा प्रमुख भावे यांना निवेदन देण्यात आले आहे.
कळमसरे मार्गे शिरपूर बस देखील सुरू व्हावी यासाठी शालेय विद्यार्थी तसेच कळमसरे परिसरातील ग्रामस्थांनी एसटी महामंडळला वेळोवेळी लेखी व मौखिक निवेदन सादर केले आहे. मात्र प्रत्येक वेळी शहापूर रस्ता खराब असल्याचं कारण पुढे आले आहे.परिसरातील बहुतेक जणांचे नातेसंबंध तसेच आप्तेष्ट सगे सोयरीक असून डेली दोन टाईम चालू असलेली बस केवळ आणि केवळ रस्त्याच्या दुरवस्था मुळे बंद असल्याने, शिरपूर जाण्यासाठी प्रवाशी बांधवांना मारवाड किंवा वासरे या मार्गे फेऱ्याने प्रवास करावा लागत आहे. लोकप्रतिनिधीनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरपूर बस पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.
निवेदन देतेवेळी भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, पंचायत समिती उपसभापती भिकेश पाटील ,भाजपा उपाध्यक्ष महेंद्र पाटील ,ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष दिलीप पाटील ,लोणबुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच कैलास पाटील ,मुडी येथील भाजपा शाखा प्रमुख हर्षल पाटील, भाजपा सरचिटणीस विलास सूर्यवंशी हे उपस्थित होते. निवेदन देते वेळी झालेल्या चर्चेत मुडीच्या पुढे एकविरा फाटा ते वालफाटा या दरम्यान पांजरा नदी जवळील पूल, पुलावरील रस्ता खराब असल्याचे समजले.