Home Cities अमळनेर ढेकू-पिंपळे रोड परिसरातील भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत निवेदन

ढेकू-पिंपळे रोड परिसरातील भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत निवेदन

0
46

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ढेकू रोड-पिंपळे रोड परिसरातील भटक्या जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नगरसेवक शाम पाटील यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदनव्दारे केली.

मागील अनेक दिवसांपासून ढेकू रोड-पिंपळे रोड परिसरात भटके कुत्रे लहान मुलांना व जेष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना लक्ष करून चावा घेण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. तसेच डुकरांमुळे अनेक लोकांचे अपघात होऊन गंभीर इजा झाल्याचे प्रकार देखील घडत असून सततच्या घटना घडत राहिल्यास सामान्य नागरिक किंवा लहान बालकांच्या जिवीतास धोका उद्भवू शकतो. तरी पालिकेने उपाययोजना करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी नगरसेवक शाम पाटील यांनी पालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी श्याम पाटील, सुमित पाटील, गणेश बोरसे, निखिल सूर्यवंशी हे देखील उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound