यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल आगारातून दररोज सकाळी ७ वाजता व ७:३० वाजता यावल ते पुणे अशा लागोपाठ दोन बसेस भुसावळ जामनेरमार्गे पुणे येथे जाण्यासाठी निघतात, यातील एक बस ही डांभूर्णी मार्गे सुरू करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांना देण्यात आले.
यावल आगारातून दररोज सकाळी ७ वाजता व ७:३० वाजता यावल ते पुणे अशा लागोपाठ दोन बसेस भुसावळ जामनेरमार्गे पुणे येथे जाण्यासाठी निघतात. मात्र यावल तालुक्याच्या पश्चिम भागाकडुन यावल आगाराची एकही बस पुणे जात नाही म्हणून या भागातील प्रवाश्यांना जळगाव येथुनच पुणे येथे जाण्याचा साठी प्रवास करावा लागतो मात्र यावल आगाराने जर सकाळी एक बससेवा साकळी, किनगाव, डांभुर्णी, विदगाव, जळगाव व छत्रपती संभाजीनगर मार्गे पुणे जाण्यासाठी सुरू केली तर तालुक्यातील पश्चिम भागातील बहुतांशी प्रवाश्यांना याचा फायदा होईल व यावल आगाराला ही बससेवा सुरू करून उत्पन्नही चांगले येईल. त्यामुळे यावल ते पुणे बससेवा डांभुर्णी मार्गे सुरू करावी अश्या आशयाचे डांभुर्णी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे पत्र यावल आगर व्यवस्थापक दिलीप महाजन यांना दिले. यावेळी ग्रा.प.सदस्य शुभम गिरीश विसवे,लोकेश जयवंत सोनवणे, भुषण शालीक साठे, उमाकांत प्रकाश पाटील इ.सह ग्रामस्थ उपस्थीत होते.