चाळीसगाव प्रतिनिधी । विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या दाखल्याबरोबर पुरावा जोडूनही दाखला मिळण्यास विलंब होत असल्याने सदर दाखला तातडीने दिला जावा अशी मागणी अध्यक्ष दिनकर राठोड यांनी उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
स्वातंत्र्योत्तर काळानंतर विजाभजा व बंजारा जमातीचे दाखला काढण्यासाठी सन: १९६१ चा पुरावा जोडण्यात येत आहेत. मात्र सदर दाखला काढण्यासाठी त्याबरोबर सन: १९६१ चा पुरावा जोडूनही वेळेवर न मिळत असल्याने विद्यार्थ्यांसह अनेकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हि गंभीर स्वरूपाची बाब लक्षात येताच विजाभजा आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनकर राठोड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सदर निवेदनात देशाला स्वातंत्र्य मिळायला ७५ वर्षे झाली. परंतु हल्ली विजाभजा जमातीचे दाखला काढण्यासाठी खूप झटावे लागते. त्याचबरोबर पुरावा मिळाला नाही तर सर्वसामान्य माणसांची पिळवणूक होते. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना वेळेवर जातीचा दाखला न मिळाल्यामुळे त्याला शिक्षणापासून मुकावे लागले आहेत. त्यामुळे हि जाचक अट रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. त्यामुळे जातीचा दाखला तातडीने दिला जावा, अशी मागणी तालुकाध्यक्ष दिनकर राठोड यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर विजाभजा आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनकर राठोड, माजी पं.स. सदस्य बापूराव पाटील, सरपंच महेंद्रसिंग राठोड (सांगवी), उपसरपंच आनंदा राठोड, ग्लोबल बंजारा अस्तित्व अशोक राठोड, माजी उपसरपंच देवीदास राठोड व करगांव वि.सो.चे चेअरमन बाबूराव मराठे आदींनी सह्या केल्या आहेत.