रंगकर्मींच्या मागण्यांसंदर्भात बैठक बोलविण्याबाबत निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आहे. याचा सर्वात जास्त फटका मनोरंजन क्षेत्राला बसला असून विविध क्षेत्रातील रंगकर्मीचे हाल होत आहे. तसेच विविध मागण्यासाठी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना निवेदन देवून तात्काळ मागण्यांच्या सोडवणुकीसाठी येत्या आठवडाभरात बैठक बोलवावी, अशी मागणी रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र,(मुंबई) तर्फे करण्यात आली आहे. 

दरम्यान, या महामारीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अत्यावश्यक सेवेत हे क्षेत्र येत नसल्याने याकडे दुर्लक्ष केले गेले असून ८० टक्के रोजंदारीवर काम करणाऱ्या या घटकांकडे मायबाप सरकारने सपशेल पाठ फिरवली आहे. जनसामान्यांना मनोरंजनातून निखळ आनंद देणाऱ्या रंगकर्मीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे रंगकर्मी अस्वस्थ झाले आहेत.

सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या आणि विविध कलागुणांचा वारसा समर्थपणे चालवणा-या तमाशा, भजन, कीर्तन, भारुड, गोंधळ, जागरण, पोवाडा, लावणी, दशावतार, डोंबारी, लेझीम, वासुदेव, पोतराज,  दीबैल, पिंगुळा, भराड इ. लोककला सादर करणाऱ्या तसेच वाद्यवृंद क्षेत्रातील कलाकारांच्या आणि सिनेमा, मालिका,नाटक क्षेत्रात करणाऱ्या कलाकार तंत्रज्ञांच्या मागणीचे निवेदन देत आहोत. कोरोना महामारीच्या कळात लॉकडाऊनमुळे उदभवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि काही कायमस्वरुपी मागण्यांचा यामधे समावेश करण्यात आला आहे.

कोरोना काळातील मागण्या

१.एक पात्री की व दोन तीन लोकांच्या मदतीने सोसायटीच्या आवारात किंवा मोजक्या जागेत सादर होणाऱ्या कलांना तात्काळ परवानगी मिळावी.

२.फी न भरल्यामुळे रंगकर्मीच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे तात्काळ संबंधित शिक्षण संस्थांशी बोलून हा प्रश्न निकाली काढावा.

३.गेल्या दीड वर्षात काम नसल्याने कमाई झालेली नाही त्यामुळे घर भाडे किंवा इलेक्ट्रिसिटी बिल भरण्यास अडचण होत आहे. आपल्या अखत्यारीत असलेल्या संबंधित आस्थापनांना आपण आदेश देऊन रंगकर्मींना सवलत मिळवून द्यावी ही विनंती.

४.ओटी नियमांचे पालन करुन आम्हा रंगकर्मींना आमची कला सादर करण्याची परवानगी द्यावी.

५.काही प्रमाणात चित्रीकरण सुरू झाले आहे परंतु लोकल प्रवासाची मुभा नसल्यामुळे मिळणारे उत्पन्न आणि खर्च तसेच वेळेचा ताळमेळ घालने कठीण झाले आहे त्यामुळे शूटिंग चालू असलेल्या कलाकार तंत्रज्ञाना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी.

६.महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींसाठी रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करावी.

७.कोरोना काळातील परिस्थिती पूर्व होई पर्यंत महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींना दरमहा रुपये पाच हजार रुपये इतका उदरनिर्वाह भत्ता मिळावा.

कायमस्वरूपी मागण्या

१.महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विखुरलेला रंगकर्मींची शासनदरबारी नोंद व्हावी.

२.कलाकार पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटींमध्ये शिथिलता आणावी तसेच मानधनाच्या आकड्यात वाढ करावी.

३.रंगकर्मी हा असंघटित आहे. माथाडी कामगार बोर्डाच्या धर्तीवर रंगकर्मी बोर्डाची स्थापना करावी.

४.मुंबईत कला सादर करण्यासाठी येणाऱ्या रंगकर्मींना भाडेतत्त्वावर देण्यासाठी शासनातर्फे बांधण्यात येणाऱ्या निवासी गाड्यांमध्ये प्राधान्याने व सवलतीच्या दरात सोय करण्यात यावी तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रंगकर्मींसाठी असलेला विश्रांतीगृह मध्ये कलाकारांना राहण्याची परवानगी असावी.

५.शासनातर्फे रंगकर्मींसाठी राखीव ठेवलेल्या महाड व सिडकोच्या घरांसाठी संख्येत पाच टक्के वाढ करावी.

६.निराधार वयोवृद्ध रंगकर्मीची शासकीय व राखीव खाजगी विश्रामगृहात प्राधान्याने व्यवस्था करावी सोबत त्यांची जबाबदारी शासनाने घ्यावी.

७.महाराष्ट्रातील सरकारी तसेच नगरपालिका व जिल्हा परिषद हॉस्पिटलमध्ये रंगकर्मींसाठी राखी वेळ असावेत. विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले आहेत.

 

 

Protected Content