आदिवासी कोळी बांधवांचे मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील आदीवासी कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र आणि जातीचा दाखला मिळण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जळगाव येथील विमानतळ येथे आदिवासी कोळी समाज बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी जळगावातील सागर पार्क येथील कार्यक्रमासाठी जळगाव विमानतळावर दाखल झाले त्यावेळी कोळी समाज बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्गीय आणि विशेष मागास वर्गीय यांच्या जातीच्या प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणी संदर्भात २००० मध्ये सुधारणा करण्याबाबतच्या आदेशाला विरोध करत आदिवासी टोकरे कोळी समाजाने मागण्यांचे निवेदन दिले आहे. शिवाय वैधता प्रमाणपत्र पुनर्विलोकन करणे, अपिलीय प्राधिकरण गठीत करणे, दंडाच्या रकमेत वाढ करणे आणि एफआयआरची तरदूत करणे, समितीच्या सदस्यांना संरक्षण देणे आदी सुधारणावरील अधिनियमात करण्याचे मंत्रिमंडळात मान्यता दिली असून याला रद्द करावी अशी मागणी करत आदिवासी कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र आणि जातीचा दाखला देण्यात यावा अशी मागणीही या निवेदनातून केली आहे. याप्रसंगी प्रा.भाऊसाहेब सोनवणे, मंगला सोनवणे, भगवान सोनवणे, पंकज सपकाळे, अमित सोनवणे, गुलाब बाविस्कर, साहेबराव सैंदाणे, जितेंद्र सपकाळे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content