वंचित बहुजन आघाडीचे विविध मागण्यांसाठी निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रास्त धान्य दुकानांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाची दखल घेण्यात यावी, या मागणीसाठी जळगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांना मंगळवारी १३ सप्टेंबर रेाजी दुपारी २ वाजता निवेदन देण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी रास्त धान्य दुकानांच्या संबंधित मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, इंगळे यांनी सुरू केलेल्या उपोषणाची तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी जळगाव तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुठल्याही प्रकारची पुर्वकल्पना न देता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यात रास्त भाव दुकानांच्या जाहीरनाम्यानुसार ज्या संस्था व बचत गट यांना देण्यात आलेल्या मंजूरीचे आदेश रद्द करण्यात यावे, नव्याने पारदर्शकपणे पात्र संस्था व बचतगट मंजूर करावे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी दिलेल्या मंजूरीचे आदेश तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

या निवेदनावर जळगाव तालुका सदस्य विजय अहिरे, तालुका महासचिव विजय कोळी, जिल्हा उपाध्यक्ष भगवान धनगर, तालुका उपध्यक्ष रविंद्र पवार, तालुका अध्यक्ष प्रविण सपकाळे, हिम्मत सपकाळे, जितेंद्र शिरसाठ यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content