जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महापालिका आवारात लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण हे ३१ ऑक्टोबर रोजी त्यांच्या जयंती दिनी करावी अशी मागणीचे निवेदन नगरसेवक यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना देण्यात आले आहे.
जळगाव महापालिका आवारात लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा बसविणासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवाय लोहपुरूषांचा पुतळा देखील काही दिवसांपुर्वी महापालिकेत दाखल झाला आहे. पुतळा अनावरणाची तयारी देखील महापालिका प्रशासनाकडून केली जात आहे. दरम्यान, महापालिकेतील नगरसेवकांनी पुतळा अनावरण करण्यासंदर्भात निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की, येत्या ३१ ऑक्टोबर रोजी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्याच दिवशी महापालिकेत बसविण्यात येणाऱ्या पुतळ्याचे अनावरण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. याप्रसंगी माजी महापौर सिमाताई भोळे, माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक जितेंद्र मराठे, नवनाथ दारकुंडे, नगरसेविका सुचिता हाडा, दिप्ती काळे यांच्यासह आदी नगरसेवक उपस्थित होते.