भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील रेशनदुकानदार बांधवांना ई-पास मशीनला येणाऱ्या अडचणी व समस्या संदर्भात भडगाव तहसीलद नायब तहसीलदार सुधीर सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या १५ ते २० दिवसांपासून ई-पास मशीन व्यवस्थित चालत नाही दुकानदार बंधुनी ई-पास मशीन चालू केल्यावर लगेच सर्व्हर डाऊन होत आहे. मशीन चालू होत नाहीत, त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास होत आहे. लाभार्थी व दुकानदार मध्ये गैरसमज होत असतो. लाभार्थी ना त्रास झाल्यामुळे ते आम्हाला पटेल ते बोलुन जातात. आमच्या समस्यांकडे लक्ष देऊन आम्हाला वाटप करण्यास मुदत वाढ मिळावी, चालू महिन्याचे वाटपासाठी पुढील महिन्यात मुदत वाढ देण्यात यावी, तरी आपण प्रशासनाला आपण आपल्या स्तरावरुन कळवावी अशा संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी भडगाव तालुका रेशनदुकानदार संघटनेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष आंनदाराव सोनवणे, सचिव लक्ष्मणराव पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व दुकानदार बंधु उपस्थित होते.