नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी ‘मनसे’चे तहसीलदारांना निवेदन

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिकांना रेशन कार्ड, गरजू लाभार्थ्यांना स्वस्त धान्य मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मनसेच्या वतीने तहसीलदार श्वेता संचेती यांना निवेदन देण्यात आले.

मुक्ताईनगर तालुक्यातील तहसील कार्यालय, रेशन धान्य दुकानातील त्रुटी व विविध विषयांवर तत्काळ कार्यवाही व्हावी आणि रेशन कार्ड संदर्भात नागरिकांची होत असलेली फरफट थांबवावी या मागणीसाठी मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात, “तालुक्यातील २०१७ ते २०२१ पर्यंतच्या प्राधान्य व अंत्योदय कार्डधारकांना नियमाच्या बाहेरून लाभ मिळवून देणाऱ्या पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून कायदेशीर करण्यात यावी.

यासह nph, phh, अंत्योदय धारक यांना १२ अंकी ऑनलाईन नंबर देण्यात यावे, ‘मुक्ताईनगर’ येथील ठेकेदारांच्या मार्फत ‘ऑनलाईन कार्ड व वाढीव नावे’ या बाबतीत काही परस्पर रेशन मालाचा काळाबाजार थांबविणे, नवीन रेशन कार्ड, दुय्यम कार्ड, विभक्त रेशन कार्डसाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने देण्यात यावे, अपंग, विधवा, दिव्यांग यांना स्वतंत्र कार्ड देण्यात यावे, युनिट संख्याअभावी लाभार्थ्यांचे कार्ड बंद करू नये. कायमचे बाहेरगावी गेलेले लाभार्थी, मृत लाभार्थी, बोगस नावाने तयार केलेले कार्ड, लाभार्थींची नावे कमी करून नवीन nph लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे आदी. विषयाची गांभीर्याने लक्ष देऊन लाभार्थ्यांना न्याय द्यावा” अशा आशयाच्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या असून ‘रेशन दुकानदारांनी हुकुमशाही सुरु ठेवल्यास मनसे स्टाईलने आंदोलन व उपोषण करण्यात येईल’ असा इशारा देत संबधितांवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मुक्ताईनगर मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई यांनी तहसीलदार श्वेता संचेती यांना विनंती केली.

यावेळी तालुका उपाध्यक्ष श्रीराम भोई, मंगेश कोळी, अरुण नागरुत, मधुकर पाटील, किशोर पेटारे, संतोष डोंगरे, अयुब खान, सुनील कोळी, कल्पना गांगतिरे, नर्मदा सोळुंके, सीताबाई भील, किशोर भोई आदी पदाधिकारी व मनसे सैनिक उपस्थित होते.

 

Protected Content