जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान वाढ, वर्ग बदल, नवीन मान्यतेसह इतर प्रलंबित मागण्यासाठी जळगाव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाला शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यातील कार्यरत सार्वजनिक ग्रंथालयांना सन-२०१२ पासून प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलन निवेदन देण्यात आले आहे. परंतु या गंभीर प्रश्नांची सोडवणूक केलेली जात नाही. या अनुषंगाने ग्रंथपाल व इतरांवर आत्महत्या व उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या अनुषंगाने शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जळगाव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जळगाव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघांचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, कार्यवाहक संजय पाटील यांच्यासह आदी सदस्य उपस्थित होते.