भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील हरेश्वर पिंपळगाव येथिल मुलीवर झालेला अतिप्रसंग व ओमळी ता. चिपळुण जि. रत्नागिरी येथिल नाभिक कन्या निलिमा चव्हाण संशयास्पद मृत्यू या दोघे घटनेचा योग्य तपास करुन आरोपीना कठोर शासन व्हावे. यासाठी भडगांव तहसीलदार मुकेश हिवाळे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रसेन पालकर यांना नाभिक समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी समाज अध्यक्ष संजय पवार (पत्रकार), उपाध्यक्ष रविंद्र शिरसाठ, सचिव अँड. भरत ठाकरे, खजिनदार दिपक शिरसाठ, कार्यकारणी सदस्य सुभाष ठाकरे, भगवान नेरपगार, नामदेव चव्हाण, दिलीप शिरसाठ, सुर्यभान वाघ, विनोद शिरसाठ, कीशोर निकम, हिलाल नेरपगार, शिवाजी शिरसाठ, निलेश महाले (पत्रकार), राकेश शिरसाठ, संजय शिरसाठ, प्रभाकर नेरपगार, गणेश शिरसाठ, विजय पवार, बबलू पवार, तुळशीदास निकम, संदिप पवार आदी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी आपल्या समाज भावना शासनापर्यंत पोहचविण्यात येतिल असे अश्वासन दोन्ही शासकीय अधिकारी यांनी उपस्थित समाज बांधवाना दिले.