परभणी घटनेच्या निषधार्थ आंबेडकरी समाज बांधवांचे निवेदन !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाच्या प्रतिमेची अज्ञात माथेफिरूने विटंबना केल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजातर्फे ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करण्यात आली. विटंबनेप्रकरणी माथेफिरूला फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशीही मागणी करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाच्या प्रतिमेची अज्ञात माथेफिरूने विटंबना केल्याचा प्रकार घडली आहे. तेथील पोलिस प्रशासनातर्फे परभणी शहरात मागासवर्गीय वस्तीत कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. जवळपास ४०० युवक व महिलांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले. ते गुन्हे तत्काळ रद्द करावे. पोलिसांकडून मागास वस्तीत जाऊन वाहनांची व इतर वस्तूंची तोडफोड करण्यात आली, अशा पोलिसांचे तसेच परभणी शहराच्या पोलिस निरीक्षकांना तत्काळ निलंबित करून गुन्हे दाखल करावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. राजेश साळुंखे, गोकुळभाई सोनवणे, किरण अडकमोल, शंकर सोनवणे आधी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content