भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रामानंद हॉल येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्याहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी, प्रा. सुनिल नेवे, उमेश नेमाडे, प्रमोद चौधरी, ॲड. बोधराज चौधरी, अमोल इंगळ, दिनेश नेमाडे यांच्यासह आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत एकुण २५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यात औरंगाबाद, हिंगोली, आकोला, नागपूर, मुर्तीजापूर, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, मालेगाव, अमळनेर, बडनेरा या ठिकाणचे खेळाडू सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनवर अली, मंगेश भोंगाडे, सोपान रंगारी, सुनिल ठिनरे, राकेश सपकाळे, सुमेध शेजवळ, राकेश आगरकर, धनराज बाविस्कर, प्रसंजित खरात, नितीन हिवरकर, अजय शेळके यांच्या आदींनी परिश्रम घेतले.