जामनेर प्रतिनिधी । आरोग्य खात्यातील परीक्षा ऐन वेळेवर राज्य सरकारने रद्द करून एका प्रकारचे बेरोजगार तरुणांची शासनाने आता थट्टा चालवली असल्याची टीका आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे.
यासंदर्भात आज गिरीश महाजन म्हणाले की, बरेच विद्यार्थी दोनशे चारशे किलोमीटर गेले आहेत. परीक्षा केंद्रावर पोचले व त्यांना वेळेवर परीक्षा रद्द झाल्याची सांगण्यात आली. या आरोग्य विभागाच्या परीक्षेला राज्यातील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांचा भ्रमनिरास झाला असून मात्र आरोग्य मंत्री फक्त माफी मागून मोकळे होता का असा सवाल राज्याचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे. दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. पंचनामे झाले मात्र अजूनही एक पैसा सुद्धा शासनाकडून मदत मिळाली नाही. राज्यातील जनतेला या आघाडी सरकारने रस्त्यावर सोडले आहे. त्यामुळे हे सरकार चालले तरी काय? असा प्रश्न आमदार महाजन यांनी माध्यमांशी बोलताना विचारला आहे.