जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य कर्मचारी संपावर जाणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील तब्बल १७ लाख राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीची आज मुंबईत बैठक पार पडली. बैठकीत राज्य सरकारी कर्मचा-यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी याबाबत माहिती दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनप्रमाणे नवीन पेन्शन देण्याची मागणी लावून धरली आहे.

कृती समितीचे प्रमुख विश्वास काटकर यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारने तात्काळ नोटिफिकेशन काढण्याची मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली. तसेच नोटिफिकेशन निघत नाही, तोपर्यंत संप सुरु ठेवण्याचा निर्धारही बोलून दाखविला. राज्यातील १७ लाख सरकारी, निम सरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत, यासंबंधीचा निर्णय आज मुंबई येथील समन्वय समितीच्या विस्तारीत सभेत झाला.

राज्य सरकारने पेन्शनबाबत जे आश्वासन दिले, ते अद्याप पाळण्यात आलेले नाही. सामाजिक आणि आर्थिक सुलक्षण म्हणून जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन मिळेल, असे आश्वस्त करूनही त्या संदर्भातील नोटीफिकेशन निघू शकलेले नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी, शिक्षक चिंतेत आहेत, असे विश्वास काटकर म्हणाले.

Protected Content