Home राजकीय राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘या’ तारखेपासून !

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘या’ तारखेपासून !


मुंबई-वृत्तसेवा | राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 25 मार्च 2026 या कालावधीत मुंबई येथे पार पडणार आहे. राज्य सरकारने अधिवेशनाचे वेळापत्रक निश्चित केले असून 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये दिवंगत अजित पवारा यांच्या अपघाती निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यानंतर नियमित कामकाजास सुरुवात होईल.

दरम्यान, अधिवेशन काळात काही दिवस सुट्ट्यांमुळे कामकाज होणार नाही. शनिवार, 28 फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी असूनही विधिमंडळाचे कामकाज चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सोमवार, 2 मार्च रोजी होळी आणि 3 मार्च रोजी धूलिवंदन यानिमित्त कामकाज होणार नाही. तसेच 19 मार्च रोजी गुढीपाडव्याची सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशीही कामकाज होणार नाही. याशिवाय 20 मार्च रोजी देखील विधिमंडळाचे कामकाज स्थगित राहणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याच्या आर्थिक धोरणांवर, विकासकामांवर आणि विविध महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता असून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.


Protected Content

Play sound