Home अर्थ सावदा येथे खडीकरणास प्रारंभ

सावदा येथे खडीकरणास प्रारंभ

0
30

सावदा प्रतिनिधी । येथील पालिका हद्दितील सोमेश्वर नगर आणि इतर परिसरातील रस्ते, गटारी, पथदिवे यांसारख्या समस्यांना गेल्या अनेक दिवसांपासून सामोरे जावे लागत आहे. नुकतेच सावदा येथे झालेल्या आढावा बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी हे मुद्दे उपस्थित केले असून लवकरच समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, खडीकरणास निधी मंजूर झाला असून प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली आहे.

यावेळी या कामाचे शुभारंभा प्रसंगी येथील नगरसेवक राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादीचे गट नेते नगरसेवक, फिरोज खान हबीबुल्ला खान पठाण, माजी नगरसेवक फिरोज खान अब्दार खान, शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी, भरत नेहेते, गौरव भैरवा, मनीष भंगाळे, शाम पाटील, राष्ट्रवादीच्या महिला आघाडी शहराध्यक्षा सौ, कल्पना ठोसरे यांचे सह या परिसरातील नागरिक उपस्थित होते, या परिसरसतील नागरिकांचे हस्तेच कूदळ मारून व पूजन करून या कामास सुरवात करण्यात आली. या कामाची सुरूवात झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

आ.पाटील यांनी आढावा बैठकीत दिलेली वचन पूर्ति केली या बाबत देखील समाधान व्यक्त केले, यावेळी या परिसरातील दिपक भारंबे, मधुकर पाटील दिपक चौधरी, सचिन बढे, तुषार बढे, निखिल महाजन, सुवर्णा भारंबे, कल्पना ठोसरे, पुष्पा साळी, विभावरी बेंडाळे, रुपाली चौधरी, वंदना महाजन, प्रतीक लोखंडे, सोनू लोखंडे, विकास भोई, हरी फेगडे, नालिनी महाजन, वर्षा जैन आदी नागरिक उपस्थित होते,


Protected Content

Play sound