Home Cities जळगाव जळगावात दहशतवादविरोधी मोर्चाला सुरुवात

जळगावात दहशतवादविरोधी मोर्चाला सुरुवात


जळगाव (प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देश्यीय संस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दहशतवादविरोधी मोर्चाला नुकतीच सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या पुढाकाराने शहरातून हा मोर्चा निघत आहे.

आज दुपारी ४ वाजता हा मोर्चाला चौबे शाळेपासून सुरूवात झाली. हा मोर्चा घाणेकर चौक,टॉवर चौक, नेहरू चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, कोर्ट चौक,स्टेडियम चौक, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौकापासून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचणार आहे. येथे विविध वक्ते मनोगत व्यक्त करतील. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यान, या मोर्च्यात शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी सहभागी झाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound