यावल प्रतिनिधी | तालुक्यातील वाघझिरा येथील आश्रम शाळेत शिक्षणासाठी विद्यार्थिनींना जंगलातुन पायदळ जावे लागत आहे. यावल आगारातून नायगाव मार्ग बस सेवा सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एसटी आगारा व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावल येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील एस टी आगाराचे व्यवस्थापक एस व्ही भालेराव यांना सहाय्यक वाहतुक अधिक्षक संदीप अडकमोल यांच्या उपस्थितीत दिलेल्या लिखीत निवेदनात म्हटले आहे की , राज्य शासनाने आदीवासी मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ,वाघझिरा तालुका यावल ही शाळा देखील कोरोनाच्या संकटकाळानंतर पुनश्न इत्तया १ते १२वी पर्यंत वर्ग सुरू करण्यात आली असुन , या आदीवासी आश्रमशाळेवर शिक्षणासाठी या ठीकाणी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावातील व पाडयांवरील मुले, मुली या ठीकाणी येत असतात, या शाळा सुरू होण्यास जवळपास एक महीन्याचा कालावधी झाला असुन, असे असतांना ही शिक्षणासाठी जाणे येणे साठी एसटी महामंडळाच्या वतीने यावल ते नायगाव पाडयांच्या मार्गावरून बससेवा सुरू झाली नसल्याने या परिसरातील राहणाऱ्या आदीवासी विद्यार्थीनींना जवळपास ७ते ८ किलोमिटर धोकादायक अशा जंगलातील मार्गाने पायी जावुन शाळेत जावे लागत आहे.
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष वाघझीरा आश्रम शाळेत जावुन या ठीकाणी मुख्याध्यापक व शिक्षकांना या संदर्भात माहीती घेवुन विचारणा केली असता , आम्ही जंगलातुन येणाऱ्या आदीवासी मुलींच्या या समस्या संदर्भात यावल एसटी महामंडळाचे व्यवस्थापक यांना याबाबतचे लिखित स्वरूपात पत्रव्यवहार केलेला असल्याचे सांगुन उडवाउडवीचे उत्तरे देतांना दिसुन आलेत , तरी यावलच्या आगारातुन नायगाव मार्ग बस ही १० , ३oवाजता व दुपारी शाळेपासुन४वाजता या वेळेस बससेवा सुरू करावी , आपण तात्काळ दोन दिवसाच्या आत ही बससेवा सुरू करावी व विद्यार्थ्यांचे होणारे हाल व धनाढ्य व सुनसान अशा जंगलाच्या मार्गावरून पायदळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनीवर काही अतिप्रसंग झाल्यास तसेच काही हिंस्र प्राण्यांपासुन देखील जिवितास धोका निर्माण झाला असुन असा काही प्रकार घडल्यास या घटनेस आपले एसटी महामडळ जबाबदार राहील याकरीता विद्यार्थ्यांचे होणारी ही सर्व समस्या तात्काळ थांबवावी अन्यथा महाराष्ट्र नव निर्माण सेना ही शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेवुन यावल आगारा समोर ठीय्या आंदोलन करणार असा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे . या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर विभाग जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, रस्ते , साधन सुविधा व आस्थापना जिल्हा संघटक राजेन्द्र सुकलाल निकम, विद्यार्थी सेनाचे गौरव कोळी , विपुल येवले , शहर अध्यक्ष किशोर नन्नवरे ,यावल शहर उपप्रमुख आबिद कच्छी , तालुका उप संघटक विकास पाथरकर यांच्या स्वाक्षरी आहे .