Home धर्म-समाज भुसावळ-मुंबई पॅसेंजर सुरू करा- काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी

भुसावळ-मुंबई पॅसेंजर सुरू करा- काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी


पाचोरा प्रतिनिधी । भुसावळ-मुंबई रेल्वे तातडीने सुरूवात करून सामान्य टिकीट सुरू करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक दिवसांपासून अप – डाउन करणारे प्रवासी आणि सर्व सामान्य नागरिक सामान्य तिकीट व महीन्याची पास बंद असल्याने हैराण झाले आहेत. त्यातच एसटी बस बंद असल्याने गोरगरीब जनतेला खाजगी बसचा प्रवास न परवडणारा आहे. त्यामुळे भुसावळ – मुंबई पॅसेंजर तात्काळ सुरू करण्यात यावी, अन्यथा रेल्वेस्थानक बाहेर काँग्रेसकडून जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी इशारा दिला आहे. भाजपा प्रणित मोदी सरकार आपल्या नफेखोरी वृत्तीमुळे गोरगरीब व सर्व सामान्य जनतेचा विसर पडला आहे. अदानी समूहाच्या मालगाड्या सरकारच्या रेल्वे लाईनवर जास्त प्रमाणात धावत आहेत त्यामुळे रेल्वेच्या बहुतांश गाड्या अद्याप ही बंद आहेत. देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाखो च्या संख्येने सभा घेत आहेत मग रेल्वेतच कोरोना कसा ? असा सवाल सचिन सोमवंशी यांनी व्यक्त केला आहे.

 


Protected Content

Play sound