पुरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओडिशातील पुरी येथे भव्य आणि ऐतिहासिक भगवान जगन्नाथ रथयात्रेला रविवार पासून सुरुवात झाली आहे. दरम्यान या रथ यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक जमले असून या यात्रेत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत एका भविकाचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो भाविक जखमी झाले. रथ ओढत असताना हाणामारीत ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या आपत्कालीन सेवांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भगवान जगन्नाथाच्या ऐतिहासिक रथयात्रेत लाखो भाविकांनी गर्दी केली होती. यंदा ही यात्रा दोन दिवस चालणार आहे.
भगवान जगन्नाथाचा अंदाजे ४५ फूट उंच लाकडी रथ ओढण्यासाठी रविवारी, ७ जुलै रोजी पुरीत लाखो लोक जमले होते. हे वार्षिक आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे, ज्यामध्ये भगवान जगन्नाथ आणि देवी सुभद्रा यांचे रथ भक्तांनी ओढले आहेत. या पवित्र प्रसंगी हजारो भाविक देवाचे दर्शन घेण्यासाठी जय जगन्नाथ आणि हरिबोलचा जयघोष करत या यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी सुमारे १० लाख भाविक पुरी येथील रथ यात्रेत आले झाल्याचा अंदाज आहे. चेंगराचेंगरीत शेकडो भाविक जखमी झाले आहेत. तर काही भाविकांना लहान-मोठी इजा झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. गंभीर जखमी असलेल्या भाविकांवर उपचार केले जात आहेत. चेंगराचेंगरीत मृत्यू झालेला भाविक हा परराज्यातील असून त्या व्यक्तीबाबतची माहिती मिळालेली नाही.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात रथ ओढण्यासाठी भाविक जमले होते. श्री बलभद्र यांचा रथ ओढण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. यामुळे भविकांत धक्काबुक्की सुरू झाली. या गोंधळाचं रूपांतर चेंगराचेंगरीत झालं. या गोंधळात एक भाविक खाली पडला. व इतर भाविकांनी ट्याच्या अंगावर पाय दिल्याने त्याचा चेंगरांचेंगरीत मृत्यू झाला.