मुंबई प्रतिनिधी | आज झालेल्या बैठकीनंतर राज्यातील एसटी कर्मचार्यांनी कामावर रूजू व्हावे असे आवाहन २२ कर्मचारी संघटनांनी केले आहे. तर कर्मचार्यांनी आपले वकील गुणरत्न सदावर्ते यांना बदलण्याची घोषणा देखील केली आहे. यामुळे आता एसटी कर्मचार्यांचा बंद संपुष्टात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज एसटीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथी गृहावर पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचार्यांचे प्रतिनिधींनी शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा केली. प्रदीर्घ चर्चेनंतर या बैठकीबाबतची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत एसटी कर्मचार्यांना तातडीनं रुजू होण्याचं आवाहन वेगवेगळ्या एसी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी केलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनेच्या वेगवेगळ्या पदाधिकार्यांसोबत झाली. या एसी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत संपावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची चर्चा झाली. या चर्चेनंतर कृती समितीला आश्वस्त करण्यात आलं. सरकार एसटी कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत गंभीर असून त्यासोबत आता एसटी कर्मचार्यांनी तातडीन कामावर रुजू व्हाव, असं कळकळीचं आवाहन करण्यात आलंय. एकूण २२ एसटी कामगार संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते.
दरम्यान, एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिार्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही निशाणा साधला. आमची चूक झाली, आता आम्ही वकील बदल आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली. सदावर्ते यांना हटवून आता त्यांच्याऐवजी दुसरे वकील एसटी कर्मचार्यांची बाजू कोर्टात मांडणार आहेत. वकील सतीश पेंडसे यांच्याकडे आता युक्तिवाद करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते स्वतः डिप्रेशनमध्ये आले असावेत, अशा शब्दांत यावेळी एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी सदावर्ते यांना टोला लगावला.