जळगाव प्रतिनिधी । एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय इंटरनॅशनल कॉन्फेरंन्सचे उद्घाटन प्रमुख पाहुणे तैवान येथील डॉ. चेन चिआ चोऊ यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी केमिकल इंजिनीरिंग डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.शिरीष सोनावणे, पुण्यातील इस्माईल अकबानी, प्राचार्य डॉ.के.एस. वाणी, उप प्राचार्य डॉ.संजय शेखावत, डॉ.व्ही.आर. डिवरे, समन्वयक प्रा.एन.के. पाटील, समन्वयक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. व्ही. आर. डिवरे यांनी केले.
मान्यवरांचे मार्गदर्शन
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एस. वाणी यांनी परिषदेमध्ये सहभागी असलेल्या सर्व उपस्थितांना पारंपरिक ऊर्जेचा अति वापर आणि त्यावर उपाय म्हणून संशोधना मधून नूतनीकरणक्षम ऊर्जेचा पर्याय शोधण्यावर भर दिला. डॉ. शिरीष सोनावणे यांनी जागतिक समस्याचे टिकाऊ तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले. इंजि. इस्माईल अकबानी यांनी संशोधकांनी केवळ संशोधना पुरते मर्यादित न राहता त्या शोधाचा उदोजकतेमध्ये कसा वापर करता येईल याचा विचार करावा व फक्त शोध करता न राहता शोधोजक बनावे असे सुचवले.
डॉ. चेन चिआ चोऊ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शोधांचा मानव कल्यानासाठी उपयोग व्हावा असे सांगितले. सोबत त्यांनि केलेल्या स्मार्ट मटेरियलच्या संशोधनाचे काही प्रयोग दाखविले. मान्यवरांच्या हस्ते परिषदेच्या पुस्तिका “नेवीगेटिंग द फ्युचर” चे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन परिषदेचे समन्वयक, प्रा एन के पाटील,विभाग प्रमुख, यांत्रिक अभियांत्रिकी यांनी केले.
या परिषेदेसाठी विविध विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापक उपस्थित राहत आहेत. या परिषेदत प्रामुख्याने विज्ञान, तंत्रज्ञान, मानवता, वाणिज्य, व्यवस्थपन या विषयांवर शोधनिबंध सादरीकरण व चर्चा होणार आहे. या तीन दिवसाच्या परिषदे मध्ये एकूण ६७ शोध निबंध सादर केले जाणार आहेत. परिषदेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी अथक परिश्रम करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. रीमा अडकमोल यांनी केल.