जळगाव प्रतिनिधी । एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात आज पालक मेळाव्याचे उदघाटन प्रमुख अतिथी आर्किटेक्ट, शशिकांत कुलकर्णी, यांच्या हस्ते सकाळी १० वाजता दीपप्रज्वलनाने झाले. उदघाटनाप्रसंगी प्रा.चार्य डॉ. के.एस. वाणी, डॉ. संजय शेखावत व्यवस्थापन मंडल सदस्य, डॉ. जी.के.पटनाईक डायरेक्टर ऑफ अकॅडेमीकस, बी.सी.कच्छावा, वाय.के. चित्ते डेप्युटी रजिस्ट्रार, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. कृष्णा वास्तव मॅच वर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रा.स्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. कृष्णा वास्तव यांनी केले. महाविध्यालायाचे प्राचार्य डॉ.के.एस.वाणी यांनी पालक मेळाव्यासाठी असलेल्या सर्व उपस्थितांना महाविद्यालयात उपलब्ध असलेयल्या सोइं सुविधा व विविध उपक्रम या बद्दल माहिती दिली वा मार्गदर्शन केले.
ते पुढे म्हणाले की, आज विद्यार्थी काय करतोय या विषयी पालकांनी सजग असावे. प्रमुख अतिथी अर्की शशिकांत कुलकर्णी यांनी पालक, विद्यार्थी आणि प्राद्यापक यांनी एका परिवारासारखे हितगुज करावे आणि आवश्यकता असल्यास काही सूचना कराव्यात. त्यांनी विद्यार्थयांच्या हितासाठी पालक आणि महाविद्यालय यांच्या सयुंक्तिक जबादारी विषयी चर्चा केली. या पालक मेळाव्यात विद्यापिठीस्तरीय परिक्षा, GATE परीक्षा, GRE,TOEFL व खेळ यात विशेष प्रा.विण्य मिळवलेल्या विद्यर्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. स्मार्ट इंडिया हॆकॆथॉन २०१९ मध्ये टेक्सटाईल मिनिस्ट्री या कॅटेगरी मध्ये पहिले बक्षिस पटकावलेल्या टीम आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
पालक मधुसूदन वडनेरकर आणि अशोक धर्माधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालकांनी विचारलेल्या प्रश्नांचे या वेळेची उत्तर दिले गेले तसेच पालकांनी केलेल्या सूचनांचचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सारिका पवार व प्रा. डॉ. सरोज शेखावत यांनी केले व आभार प्रदर्शन कार्यक्रमसह समन्वयक प्रा. दीपक बगे यांनी केले.पालक मेळवाच्या यशस्वीतेसाठी पालक मेळावा समितीचे प्रा.प्रशांत बोरनारे, प्रा. दीपमाळा देसाई, प्रा. मीरा देशपांडे, प्रा. नितीन जगताप, प्रा.एस.के. खोडे, प्रा.डॉ.एन.बाय. घारे, प्रा.व्ही.एस. पवार वा सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.