जळगाव प्रतिनिधी । एसएसबीटीच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात “विज्ञान, तंत्रज्ञान, मानवता, वाणिज्य आणि व्यवस्थापन” मधील ग्लोबल ट्रेंड्स या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदाचे आयोजन केलेले आहे. ही परिषद २८ – ३० डिसेंबर २०१९ दरम्यान पार पडणार आहे. या परिषदेतील प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चेन चिआ चोऊ यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यांनी डॉ. चोऊ विविध संशोधन प्रकल्पांवर आयोजित पत्रकार परिषदेत काही डेमो करून दाखविला. यावेळी जैव तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.व्ही.आर.डिवरे, प्रा.एन.के.पाटील, सहयोगी प्राध्यापक व जनसंपर्क प्रा.कृष्णा श्रीवास्तव यांची उपस्थिती होती.
या परिषदेचे आयोजन डॉ. वि.आर. डिवरे , विभाग प्रमुख, जैव तंत्रज्ञान विभाग आणि प्रा. एन. के. पाटील, विभाग प्रमुख, यांत्रिकी विभाग यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) के.एस. वाणी आणि उप प्राचार्य प्रा. (डॉ.) एस. पी. शेखावत, यांच्या मार्गदर्शना खाली केलेले आहे. शास्त्रज्ञ, अभियंते, अभ्यासक, संशोधक, व्यावसायिक यांना एकाच व्यासपीठावर आणणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे तंत्रज्ञानामध्ये सध्याच्या घडीला घडणाऱ्या घडामोडींबद्दल विचारविनिमय करण्यास मदद होईल. या परिषदेतील प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चेन चिआ चोऊ यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. ते सध्या, नॅशनल तैवान युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेकनॉलॉजि, तैपेई, तैवान, येथे प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी भौतिक विज्ञान आणि अभियांत्रिकी या शाखेत पदव्युत्तर अभियांत्रिकी पदवी सॅन यात-सेन युनिव्हर्सिटी, तैवान, येथून १९८३ ला मिळवली आहे. तसेच त्यांनी त्याच विषयात डॉक्टरेट पदवी देखील युनिव्हर्सिटी ऑफ इल्लिनॉईस, इल्लिनॉईस, अमेरिका येथून १९९० ला मिळवली आहे. संशोधन अनुभव इलेक्ट्रॉन अँड एक्स-रे डिफरकशन अँड मायसक्रोकॉपी, मायक्रो स्ट्रक्टचरल कॅरॅक्टरीझशन, फेज अँड आर्टेन्सिटीक ट्रान्सफॉर्मशन, मायक्रो स्ट्रक्टचर प्रॉपर्टी रीलेशन या विविध क्षेत्रांमध्ये आपले कौशल्य डॉ. चेन चिआ चोऊ यांनी उत्तम प्रकारे प्रदर्शित केले आहे.
या तज्ञांचा राहणार सहभाग
प्रा. शिरीष सोनवणे, केमिकल इंजिनीरिंग डिपार्टमेंट, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, वारंगल, प्रा. इस्माईल अकबानी, विभाग प्रमुख, एन्त्रेप्रेनेऊरशिप अँड इंनोवेशन, सिंबायोसिस इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, पुणे, डॉ. वेदव्यास द्विवेदी, कुलगुरू, सी. यू. शाह विद्यापीठ, वाधवान सिटी, सुरेंद्रनगर, गुजरात आणि डॉ राजेश खंबायत, सहसंचालक, पी.एस.एस. सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ वोकॅशनल एडुकेशन, भोपाळ, यांना आमंत्रित केले असून ते वेग वेगळ्या विषयावर अभिभाषण देणार आहेत.