यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील अंजाळे येथील वैकुंठवाशी जगन्नाथ महाराज यांचे शिष्य तथा शेळगाव ता. जळगाव येथील रहीवाशी हभप सुर्यभानंदजी महाराज यांना तीर्थक्षेत्र त्रषीकेश येथील आव्हान आखाडयाच्या वतीने श्री श्री १००८ महामंडलेश्वर ही उपाधि तालुक्यातील कोळवद येथे सुरू असलेल्या पुरानकथाकार तथा आखाडयाचे स्वामी माधवानंद सरस्वती यांनी आमदार हरीभाऊ जावळे व हजारो ग्रामस्थांच्या साक्षीने उपस्थीतीत प्रदान केली आहे. गेल्या महीन्यात तिथक्षेत्र प्रयागराज येथे महाकुंभ पर्वात ती जाहीर करण्यात आली होती मात्र सुर्यभानंदजी महाराजांचे कथा वाचन सुरू असल्याने त्या सोहळयास गेले नसल्याने रविवारी ही उपाधी कोळवद येथे प्रदान केली आहे.
अध्यात्मातील सर्वोच समजली जात असलेली श्री श्री १००८ महामंडलेश्वर उपाधी शेळगाव ता. जळगाव येथील प्रसिध्द भागवत कथाकार सुर्यभान महाराज यांना शंभु महादेव आव्हान आखाडा नागा संन्याशी शाखा ऋषीकेश अखिल भारतीय सनातन धर्म रक्षा समीती व अखील भारतीय षडदर्शन साधुसमाज यांच्या नियुक्तीतुन तीर्थक्षेत्र प्रयागराज येथे नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभ पर्वात श्री श्री १००८ महामंडलेश्श्वर पदवी जाहीर करण्यात आली होती. मात्र सुर्यभान महाराज हे कथा वाचनात व्यस्त असल्याने आणि सद्या तालुक्यातील कोळवद येथे सुर्यकांत पाटील व परीवराच्या वतीने संगीतमय श्री संत चरीत्र कथा सप्ताह सुरू आहे. या सप्ताहात पुरानकथाकार तथा महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी आव्हान आखाडयाचे वतीनें महामंडलेश्वर पदवी बहाल केली आहे. याप्रसंगी स्वामी माधवानंद यांनी महामंडलेश्वर पदवी कशी आणि कोणास आणि कोणाकडून दिली जाते याबाबत सविस्तर माहीती भाविकांना दिली. सुर्यभान महाराज यांचा रविवारी ३१वा वाढदिस होता वाढदिवसाच्या दिवशी ही पदवी त्यांना मिळाली असून एवढया कमी वयात त्यांना मीळालेली ही पदवी बहुदा दुर्मीळ उदाहरण असावे, असे मतही आमदार जावळे यांनी व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
हभप सुर्यभानंदजी महाराज यांना तीर्थक्षेत्र त्रषीकेश येथील आव्हान आखाडयाच्या वतीने श्री श्री १००८ महामंडलेश्वर ही पदवी मिळाल्यानंतर गंगेश्वर महादेव मंडळ व परिसरातील नागरिकांनी नेपाली त्यांचा सपत्नीक भव्य नागरी सत्कार करण्यात आला. प्रसंगी जि.प. माजी सदस्य हर्षल पाटील यांचेसह सातोद, कोळवद, वड्री, डोंगरकठोरा, यावल येथील नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होते. त्यांच्या या पदवीबद्यल शावल येथील गंगानगर, तीरुपती नगर, फालक नगर येथील नागरीकांनी रविवारी सांयकाळी महारांजाचा गौरव केला. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सुर्यभानंदजी महाराज यांनी सर्वांचे आभार मानले.