दरोडेखोरांच्या शोधार्थ पथकं रवाना ; सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु (व्हीडीओ)

6fb854a4 b726 4423 a9b3 463ad139f900

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निंबोल येथील बडोदा बँकेवर आज दुपारी दोन अज्ञात दरोडेखोरांनी बँक लुटण्याच्या उद्देशाने गोळी झाडून सहा.मॅनेजरची हत्या केल्यानंतर जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांच्या शोधार्थ परिसरात पोलिस पथकं रवाना करण्यात आले असून बँकेसह गावातील विविध सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, बँकेचे मॅनेजर महेंद्रसिंग राजपूत यांनी या घटनेचा थरार ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना कथन केलाय.

 

या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बडोदा बँकेत दोन अज्ञात हेल्मेटधरी तरुणांनी बँकेत घुसत गावठी फिस्तुल काढून बँकेतील कर्मचाऱ्यांना धमकावायला सुरुवात केली. बँकेचे कर्मचारी करण नेगे यांनी सायरन वाजविण्याचा प्रयत्न करताच एका दरोडेखोराने त्यांच्या छातीत बंदूकीच्या दोन गोळया झाडत त्यांची हत्या केली. उर्वरित कर्मचाऱ्यांनी सायरन वाजवल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. सायरन आवाज ऐकून मसाकाचे व्हा. चेअरमन भागवत पाटील,मोहन पाटील,पं.स. सदस्य जितु पाटील यांनी बॅकेकडे धाव घेत मॅनेजर करण नेगे यांना उचलून रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नेतांना वाटेत त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी निभोरा पो.स्टे. चे सपोनि प्रकाश वानखेडे दाखल होताच ,त्यांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली.

 

0540664e 0fb9 4f69 837a 5304e8239165

 

Protected Content