चाळीसगाव (प्रतिनिधी) संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब शिरसाठ यांच्या ५२ व्या वाढदिवसानिम्मित आज (दि.१ जून) आयोजित मोफत भव्य मधुमेह तपासणी शिबिरास परिसरातील नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला.
संभाजी सेनेच्या माध्यमातून वर्षभर राज्यात विविध समाजपयोगी कार्यक्रम घेतले जातात तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जनतेच्या विविध प्रश्नांसाठी रचनात्मक आणि प्रसंगी उग्र स्वरूपाची आंदोलने केली जातात. त्याचाच एक भाग म्हणून येथील संभाजी सेनेच्या कार्यालयात हे शिबिर घेण्यात आले.
सदर शिबिराची सुरुवात छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन करून करण्यात आली. प्रतिमा पूजन संभाजी सेना विधी सल्लागार अॅड. आशा शिरसाठ, सरदार पाटील सांगली, यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरास ३५० नागरिकांची मोफत तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सदर शिबिराच्या उद्देशानुसार वय वर्षे १८ पेक्षा कमी रुग्णांची बालमधुमेह दत्तक योजनेनुसार कु.श्रेया मोने या बालिकेस पुढील उपचारासाठी दत्तक घेण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश काकडे ,सुनील पाटील, गिरीश पाटील, सुरेंद्र महाजन, डॉ. उदेशिंग पाटील, अभिजीत जोशी, आबासाहेब सैंदाने, दीपक भांबरे, गुलाबराव नेरपगार, लक्ष्मण बनकर, दिवाकर महाले, द्यानेश्वर पगारे, सुरेश तिरमली, सचिन जाधव, बंटी पाटील, अरुण मोरे, प्रवीण पाटील, नीलकंठ साबणे, नारायण पाटील, आधार महाले, कृष्णा पाटील, छोटू सुधीर पाटील, संदीप पाटील, दिलीप चव्हाण, विजय देशमुख, ललीत नवले, हेमंत शेजवल, भरत नेटारे, सौ.योगिता पाटील, प्रतिक्षा बंजारा, सौ.आनिता मोरे, अंजली देवकर, गीता चव्हाण, सुचिता भांमरे, जयश्री मोरे, प्रकाश बोरसे, रेखा सूर्यवंशी, हेमलता खलाणे, कृष्णाबाई दिव्या सोनार, भारती महाले, गीता चव्हाण, जाधव, बायजाबाई चव्हाण, आदींनी परिश्रम घेतले.