Home Cities जामनेर जामनेरमध्ये दुर्गामाता महादौडला उत्स्फूर्त प्रतिसाद 

जामनेरमध्ये दुर्गामाता महादौडला उत्स्फूर्त प्रतिसाद 


जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या राष्ट्रभक्त संघटनेच्यावतीने जामनेर शहरात नवरात्रीनिमित्त भव्य दुर्गामाता महादौड आयोजित करण्यात आली. या महादौडीत तब्बल 5000 पेक्षा अधिक युवाशक्तीने भाग घेऊन शहरात देशभक्ती आणि संस्कृतीचा जागर घडविला. महादौडसह संपूर्ण जामनेर शहरात ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष दुमदुमत होता.

या भव्य महादौडची सुरुवात जामनेर शहरातील वाकी रोडपासून झाली. त्यानंतर दौड भुसावळ रोड, बजरंगपुरा, नगरखाना, श्रीराम पेठ, सोनार गल्ली, गांधी चौक, बजे गल्ली, पाचोरा रोड, राजमाता जिजाऊ चौक अशा प्रमुख मार्गांवरून विस्फोटक वातावरणात पुढे सरकली. महादौडीत भगवे ध्वज, पारंपरिक वेशातील युवक-युवती, घोष वादन, घोषणांचा गजर आणि देशभक्तीपर नार्यांनी परिसर भारावून गेला होता.

महादौड सुरू होण्यापूर्वी ध्वजपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या ध्वजपूजनाचे मान माजी नगराध्यक्ष सौ. साधना महाजन यांना मिळाले. त्यांनी भगव्या ध्वजाला पुष्पहार अर्पण करत पूजन केले आणि उपस्थित युवाशक्तीला शुभेच्छा दिल्या. यावेळी जितेंद्र पाटील, कमलाकर पाटील, अमर पाटील, डॉ. प्रशांत भोंडे आदी मान्यवरांसह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अनेक कार्यकर्ते, स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दुर्गामाता दौड ही केवळ एक शारीरिक शिस्तीची स्पर्धा नसून ती राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या विचारांची मशाल पुढे नेणारी चळवळ आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे सलग नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आणि या महादौडीद्वारे तरुणांमध्ये उत्साह, देशभक्ती आणि सामाजिक एकता दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


Protected Content

Play sound