Home Cities जळगाव प्रभाग १७ मध्ये उबाठा उमेदवार इब्राहिम पटेल यांच्या डोअर टू डोअर प्रचाराला...

प्रभाग १७ मध्ये उबाठा उमेदवार इब्राहिम पटेल यांच्या डोअर टू डोअर प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १७ ‘क’ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार इब्राहिम मुसा पटेल उर्फ इबा पटेल यांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. मेहरूण परिसरातील मलिक नगर, अक्सा नगर तसेच इक्बाल कॉलनी या भागांमध्ये त्यांनी डोअर टू डोअर प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला.

या प्रचारादरम्यान इबा पटेल यांनी नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत नागरी सुविधांबाबत मतदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख कामे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

थेट संपर्क व आपुलकीच्या संवादामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, परिसरात इब्राहिम पटेल यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकीत हा प्रतिसाद मतपेटीतही उमटेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound