चाळीसगाव, प्रतिनिधी | मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे आज (दि.१६) आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. तालुक्यातील टाकळी प्र.दे. येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला सौ.प्रतिभा मंगेश चव्हाण, वि.का.सो. चेअरमन सुभाष पवार, माजी वि.का.सो. चेअरमन उत्तम अण्णा मगर, भाजपा तालुका उपाध्यक्ष आबा बच्छे, मार्केट कमिटी संचालक धर्मा बापू काळे, माजी चेअरमन अमृतराव सूर्यवंशी, सरपंच संभाजी आबा पाटील, अण्णा पवार, दिगंबर पाटील, बापुराव पाटील, माजी सरपंच वाल्मिक सूर्यवंशी, गंगाधर पवार, राजेंद्र पाटील, ग्रा.पं. सदस्य नाना चौधरी, अल्पसंख्याक अध्यक्ष टाकळी प्र. दे. नंदलाल जैन, सुरेश सोनवणे, संजय पाटील, रामचंद्र पाटील, प्रवीण पाटील, शिवसेना शाखाध्यक्ष टाकळी प्र.दे. राजेंद्र पाटील, कावेरी पाटील, योजना चव्हाण, नितीन पवार, अमोल शिरसाठ, विजय पाटील, चेतन पाटील, दिनेश माळी, हर्षल पाटील, योगेश पाटील व रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात सुमारे ४५० लोकांनी तपासणीचा लाभ घेतला. तपासणी दरम्यान समोर आलेल्या ११५ मोतिबिंदू शत्रक्रियांसाठी ३०-३० लोकांच्या गटाने रुग्णांना पाठवण्यात येणार आहे. यावेळी रोहन सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले तर अमोल चव्हाण यांनी आभार मानले.