यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथे वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या पाहता ग्रामपंचायत प्रशासनाने आज मंगळावर व उद्या बुधवार असा दोन दिवसीय कडकडीत बंद जाहीर केला असून नागरिकांना या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावात आतापर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्याही १० वर पहोचली असुन यात१ पोझीटीव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला पुर्णपणे यशस्वी करण्यासाठी यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यांना दहीगाव बिटचे पोलीस कर्मचारी गौरख पाटील, गावातील पोलीस पाटील संतोष पाटील, दहिगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच देविदास धांगो पाटील, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सत्तार तडवी यांच्या सहकार्य लाभत आहे.