Home क्राईम भरधाव बुलेटची दुचाकीला धडक ; दाम्पत्य जखमी

भरधाव बुलेटची दुचाकीला धडक ; दाम्पत्य जखमी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वर्दळीच्या अग्रवाल चौफुली परिसरात भरधाव वेगाने आलेल्या बुलेट मोटारसायकलने दुसऱ्या एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी जखमी झाल्याची घटना घडली आहे. २९ नोव्हेंबर, शनिवारी सायंकाळी ७ वाजता ही दुर्घटना घडली असून, या प्रकरणी मंगळवारी २ डिसेंबर रोजी मध्यरात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी झालेल्यांमध्ये ज्योती दिलीप सोनवणे (वय ४५, रा. नवीन जोशी कॉलनी, जळगाव) आणि त्यांचे पती दिलीप सोनवणे यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती सोनवणे आणि त्यांचे पती दिलीप सोनवणे हे त्यांची दुचाकी (क्र. एमएच १८ डीडी ०४६८) घेऊन अग्रवाल चौकाकडून स्वातंत्र्य चौकाकडे जात होते.

नेमके त्याच वेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या बुलेट मोटारसायकल (क्र. एमएच १९ डीके ७७७९) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही सोनवणे दांपत्य रस्त्यावर पडून जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. या अपघातानंतर ज्योती सोनवणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, मंगळवारी २ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता भरधाव बुलेट चालकाविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करीत आहेत.


Protected Content

Play sound