आषाढ़ी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाड्या धावणार !

57675 indian railways tw

भुसावळ (प्रतिनिधी) आषाढ़ी एकादशीनिमित्त वारकरी आणि भाविकासाठी पंढरपुरकरीता अमरावती, खामगांव आणि भुसावल स्टेशनवरुन विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन येथील रेलवे विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

या विशेष गाड्या पुढीलप्रमाणे आहेत.

१) नवी अमरावती-पंढरपुर विशेष गाड़ी क्रमांक ०११५५ ही दिनांक ०६/०७/२०१९ आणि ०९/०७/२०१९ रोजी नवी अमरावती स्थानकावरून दुपारी ०२.०० वाजेला पंढरपुर स्टेशनसाठी सुटेल. ही गाड़ी दुसऱ्या दिवशी सकाळी ११.१५ ला पंढरपुर स्टेशनला पोहचेल. गाड़ी क्रमांक ०११५६ ही विशेष गाड़ी दिनांक ०७/०७/२०१९ आणि १३/०७/२०१९ रोजी पंढरपुर स्थानकावरून दुपारी ०४.०० वाजेला नवी अमरावती स्टेशनसाठी सुटेल. ही गाड़ी दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० ला नवी अमरावती स्टेशनला पोहचेल.ही गाडी बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, शेगांव, जलंब, नांदुरा, मलकापुर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा ,चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, भिगवन, जेऊर, कुर्दुवाडी या स्थानकांवर थांबेल. या गाडीत आठ जनरल कोच, पाच स्लीपर कोच, दोन वातानुकूलित कोच अशी या गाडीची रचना असेल.

२) खामगाव-पंढरपुर विशेष गाड़ी क्रमांक ०११५३ ही विशेष गाड़ी दिनांक ०७/०७/२०१९ आणि १०/०७/२०१९ रोजी खामगांव स्थानकावरून दुपारी ०४.२० वाजेला पंढरपुर स्टेशनसाठी सुटेल .ही गाड़ी दुसऱ्या दिवशी सकाळी ११.१५ ला पंढरपुर स्टेशनला पोहचेल तर गाड़ी क्रमांक ०११५४ ही विशेष गाड़ी दिनांक ०८/०७/२०१९ आणि १४/०७/२०१९ रोजी पंढरपुर स्थानकावरून दुपारी ०४.०० वाजेला नवी अमरावती स्टेशनसाठी सुटेल. ही गाड़ी दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.३० ला खामगांव स्टेशनवर पोहचेल. ही गाडी जलंब, नांदुरा, मलकापुर, बोदवड, भुसावळ, जळगाँव, पाचोरा ,चाळीसगांव, नांदगांव, मनमाड, कोपरगाँव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, भिगवन, जेऊर, कुर्दुवाडी या स्थानकावर थांबेल.या गाडीत सहा जनरल कोच, आठ स्लीपर कोच, दोन वातानुकूलित कोच अशी रचना आहे.

३) भुसावळ-पंढरपुर विशेष गाड़ी क्रमांक ०११४९ ही विशेष गाड़ी दिनांक ११/०७/२०१९ रोजी भुसावळ स्थानकावरून सकाळी ०९.१५ वाजेला पंढरपुर स्टेशनसाठी सुटेल. ही गाड़ी रात्री १०.१० ला पंढरपुर स्टेशनला पोहचेल. गाड़ी क्रमांक ०११५० ही विशेष गाड़ी दिनांक १२/०७/२०१९ रोजी पंढरपुर स्थानकावरून रात्री २१.५० वाजेला भुसावल स्टेशनसाठी सुटेल. ही गाड़ी दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.३० ला भुसावळ स्टेशनला पोहचेल.ही गाडी जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, भिगवन, जेऊर, कुर्दुवाडी या स्थानकावर थांबेल. या गाडीत १० जनरल कोच व सहा स्लीपर कोच अशी रचना असेल.

Protected Content