जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला डॉ. वर्षा पाटील वुमेंन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लीकेशन महाविद्यालयात महिला आरोग्य व जागरूकता या विषयावर एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल येथील स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ विभागाच्या मुख्य तज्ञ डॉ. माया आर्वीकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सत्रामध्ये डॉक्टर आर्वीकर यांनी महिला सशक्तीकरण, आरोग्याच्या प्राथमिक तपासण्या, संतुलित आहार आणि तणाव व्यवस्थापन यासारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली.
कार्यक्रमात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व, नियमित वैद्यकीय तपासणी, स्तन आणि गर्भाशयाच्या आरोग्याविषयी माहिती, जीवनशैली विकारांची जोखीम आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर प्रकाश टाकण्यात आला.सत्राच्या समारोपात महिलांनी आरोग्यासंबंधी शंका विचारल्या आणि तज्ज्ञांनी त्याचे समाधानकारक उत्तर दिले.
महिला दिनाचे खरे सामर्थ्य म्हणजे आरोग्यदृष्ट्या सक्षम आणि जागरूक महिला, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.महिला दिनानिमित्त अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होत असून, महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश महिलांच्या आरोग्यासंबंधी जागरूकता वाढवणे, तसेच त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांवर तज्ज्ञ मार्गदर्शन मिळवणे हा होता.या कार्यक्रमासाठी प्रिन्सिपल डॉ. नीलिमा वारके व सर्व महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या