Home Cities यावल फैजपुर येथे लाडक्या बहिणीसोबत विशेष संवाद कार्यक्रम

फैजपुर येथे लाडक्या बहिणीसोबत विशेष संवाद कार्यक्रम


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर शहरात भारतीय जनता पक्षातर्फे युवा कीर्तनकार सोपान कनेरकर यांचा रक्षाबंधन निमित्त विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आश्रय फाउंडेशन भाजप जिल्हा सरचिटणीस वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आहेत. हा कार्यक्रम २० ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी १ वाजता फैजपूर शहरात बस स्टॅड समोरील शुभदिव्य लॉन येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजक डॉ. कुंदन फेगडे यांनी केले.


Protected Content

Play sound