
अमळनेर (प्रतिनिधी) प्राचीन मध्ययुगीन काळातील क्षेपणास्त्र तथा विविध साहित्यांचे प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात पार्क फाउंडेशनच्या माध्यमातून इतिहासप्रेमींसाठी आयोजित केले जात आहे. नुकतेच दोन दिवस नाशिकला हे प्रदर्शन हजारो लोकांनी बघितलेय.
दि. ८ आणि ९ जूनला नाशकात ‘छंदोत्सव’ प्रचंड उत्साहात संपन्न झाला. यावेळी नाशिक शहरातील व तालुक्यातील इतिहासप्रेमींनी त्याचा आनंद लुटला. विविध छंत्र असलेल्या लोकांनी आपले छंद येथे प्रदर्शनात मांडले होते. त्यात सुरमदानी, चुना डबी, कुलुप, मुखवटे, वजरी, नदीतून लिघालेले अलंकार, व विविध प्रकारचे मिनिअचेर वस्तू एकुन 300 वस्तूंचा समावेश होता. दोन दिवस हे प्रदर्शन विश्वास गार्डन, गंगापुर रोड येथे आयोजित केलेले होते. महाराष्ट्र भरातील विविध छंद असलेले लोक यात एकत्र आले होते. विविध लोकांच्या स्वाक्षऱ्या, शुभेच्छा संदेश, कार मॉडल्स, की-चेन्स, कापुस शिल्प, छोटे 1000 गणपती, वेस्ट पासुन विविध वस्तु, पिंपळाच्या पानावर चित्र, स्वराज्याचे चलन शिवराई , antique camera’s, जुन्या वस्तु, अंगठ्या, कुलुपं असे विविध संग्राह्य वस्तुंचे हे प्रदर्शन होते. अशी माहिती स्पार्क फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज दुसाने यांनी दिलीय.