Home Cities जळगाव स्पार्क २०२६: गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात स्नेहसंमेलन व विविध उपक्रमांचा रंगारंग कार्यक्रम

स्पार्क २०२६: गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात स्नेहसंमेलन व विविध उपक्रमांचा रंगारंग कार्यक्रम


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘स्पार्क २०२६’ उत्साहात सुरू झाले आहे. डॉ. उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रा. नयना झोपे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास संचालक डॉ. प्रशांत वारके देखील उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्व सांगितले.

स्पार्क २०२६ हा कार्यक्रम २० फेब्रुवारीपासून २५ फेब्रुवारीपर्यंत विविध रंगतदार उपक्रमांसह सुरू राहणार आहे. या कालावधीत प्रोफेशनल डे, स्पोर्ट्स डे, मिस मॅच डे आणि किड्स डे अशा विशेष दिवसांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, रांगोळी, चॉकलेट डे, मेहंदी डे, ट्रेडिशनल डे, प्रेस कॉन्फरन्स, सोशल ऍक्टिव्हिटी, कल्चरल डे, डान्स, सिंगिंग आणि ड्रामा या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य व प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रा. चारुशीला चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे महाविद्यालयातील स्पार्क २०२६ ला रंगतदार स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण व सृजनशीलतेला चालना मिळणार आहे.

स्पार्क २०२६ च्या माध्यमातून महाविद्यालयाने केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातून नव्हे तर सांस्कृतिक, सामाजिक व शारीरिक विकासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 


Protected Content

Play sound