व्यवसायात प्रतिस्पर्धा न करता एकमेकांना मदत केली तरच पुढे जाल – राकेश जैन

chopda

चोपडा (प्रतिनिधी)। कोणताही व्यवसाय लहान नसतो आणि व्यवसायापेक्षा मोठा धर्म नाही बँक स्टिटमने चालते त्याच पद्धतीने आधुनिक काळात आपला व्यवसाय चालू दया अन्यथा आपण व्यवसायात मागे पडू तंत्रज्ञान युगात फक्त लक्ष्मी असून चालत नाही तर त्या सोबत सरस्वती असणे आवश्यक आहे व्यवसाय एकाने चालत नसतो तर तो अनेकांना सोबत घेऊन चालतो त्यामुळे व्यवसायात प्रतिस्पर्धा करणे सोडा आणि एकमेकांना सहकार्य करणे शिका तरच आपला व्यवसाय वाढेल असे स्पष्ट मत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध मॅनेजमेंट गुरू राकेश जैन यांनी केले. येथील दि चोपडा पिपल्स को- ऑप बँक सार्वजनिक ट्रस्ट चोपडा आणि भारतीय जैन संघटना शाखा चोपडा यांचा संयुक्त विद्यमाने आज १३ एप्रिल रोजी दुपारी चोपडा पिपल्स बँक हॉल मध्ये बिजनेस डेव्हलपमेंट सेमिनार घेण्यात आले त्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रामात यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे अध्यक्ष दि चोपडा पिपल्स को-ऑप बँक लि सार्वजनिक सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उदयोजक आशिषभाई गुजराथी, ट्रस्टचे उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, विकास गुजराथी, प्रफुल्ल गुजराथी, जैन समाजाचे उपाध्यक्ष नेमीचंद जैन, बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर पाटील, उदयोजक पंकज बोरोले, भारतीय जैन संघटनेचे जेष्ठ सदस्य डॉ.सुरेश अलिझाड, तालुका अध्यक्ष क्षितिज चोरडिया, आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवराचे स्वागत भारतीय जैन संघटनाच्या सदस्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, व्यवसायात मिसळून काम कराल तर प्रतिस्पर्धक तयार होणार नाही आणि “मी” ला सोडून “आपण” असे मनात ठेवले तर व्यवसाय वाढेल आणि तंत्रज्ञानाचा मिसयुज न करता व्यवसाय वाढविण्यासाठी उपयोग करून घ्या, व्यवसायात नफा, ट्रर्नओव्हर, याला किम्मत राहिली नाही तर व्हॅल्यूशन किती याला महत्व वाढले आहे यावेळी त्यांनी फिल्पकार्ड, फेसबुकचे उदाहरण दिले आपल्या देशाची आर्थिक सुबकता ही जगात प्रसिद्ध आहे. संपूर्ण जग आपल्या देशावर भरोसा करत आहे परंतु आपल्या देशातील लोकचं भरोसा करत नाही तसेच युथ पॉवर मध्ये ही जगात एक नंबर भारत गणला जातो कारण ३५ वर्षाच्या खाली असणारे युवक ७५ टक्के भारतात आहेत यासाठी युथ पावर म्हणून जगात ओळख भारताची आहे ग्राहकांना जास्त सन्मान देणारे व्यवसाय आपण करावा पूर्वी १० रुपयाची पेनही खिश्यात गळायची आणि २ रुपयाची पेन सुद्धा जेल आणि तीही कधी न गळणारी असते म्हणजेचं व्हॅल्यू काही नसली तरी तिचे क्वांलिटी महत्वाची आहे आणि व्यवसाय करताना किंमत में प्रतिस्पर्धा करू नये क्वॉलिटी महत्वाची आहे भांडवलच्या भरोश्यावर व्यवसायस सुरू केला की, व्यवसाय मार्यदित होत असतो मात्र बुद्धिमतेवर व्यवसाय सुरू केला तर तो दीर्घकाळ चालू राहू शकतो असे अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.

यशस्विसाठी यांनी घेतले परिश्रम
यावेळी चंद्रहासभाई गुजराथी यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमसाठी प्रसन्न गुजराथी, संजय कानडे, प्रवीण मिस्तरी, रुपेश पाटील, प्रा.शामभाई गुजराथी, नितीन काबरा, अनिल अग्रवाल, नितीन बरडीया, विनोद टाटीया आदी व्यापारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण ओस्तवाल यांनी केले. यशस्वीतेसाठी संघटनेचे उपाध्यक्ष विपुल छाजेड, सचिव दिनेश लोडाया, कोषाध्यक्ष निर्मल बोरा, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल कोचर, विभागीय जनसंपर्क प्रमुख लतीश जैन, सल्लागार दीपक राखेचा, जीतेंद्र बोथरा, मयूर जैन आकाश जैन, धिरेंद्र जैन, निलेश बरडीया, आदेश बरडीया, संदीप सुराणा, राजेंद्र टाटीया, वीरेंद्र साळी, संदीप बेदमुथ्था, राहुल राखेचा, शुभम राखेचा आदींनी परिश्रम घेतले.

Add Comment

Protected Content