आता उत्सुकता नारायण राणेंच्या आत्मचरित्राची !

मुंबई प्रतिनिधी । नारायण राणे हे आत्मचरित्र लिहणार असल्याची माहिती त्यांच्या पुत्राने ट्विटच्या माध्यमातून दिली असून यामुळे आता राजकीय वर्तुळात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी आज दुपारी एका ट्विटच्या माध्यमातून आपले वडील हे आत्मचरित्र लिहत असल्याची माहिती दिली. यासोबत त्यांनी अब आयेगा मजा…सबका हिसाब होगा असे सूचक वाक्यदेखील टाकले आहे. अर्थात, ते आपल्या आत्मचरित्रातून अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचे यातून नितेश राणे यांनी सूचकपणे अधोरेखीत केले आहे. नारायण राणे हे राज्याच्या राजकारणातील एक वादळी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात असून ते अनेक राजकीय घटनांचे साक्षीदार आहेत. यामुळे ते आपल्या आत्मचरित्रात नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Add Comment

<p>Protected Content</p>