काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधी कायम

download

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी याच काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी कायम राहणार आहेत. काँग्रेस संसदीय पक्षाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड होणार असल्याची चर्चा होती. मात्र, सोनिया गांधी यांची या पदावर निवड करून चर्चेला आज पूर्णविराम देण्यात आला.

 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तो नामंजूर करण्यात आला होता. मात्र, राहुल राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे कळले आहे. दरम्यान, आजच्या काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत लोकसभेतील पक्षाच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली. यावेळी सोनिया गांधी यांनी मतदार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. पक्षावर विश्वास दाखवल्याबद्दल मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानते, असं त्या म्हणाल्या. ‘काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल सोनिया गांधी यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे खासदार जनतेचे मुद्दे संसदेच्या सभागृहात मांडून संघर्षपूर्ण लढा देतील अशी खात्री आहे,’ असे ट्विट काँग्रेसने केले आहे.

Add Comment

Protected Content