पारोळा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी सोनार तर उपाध्यक्ष लालवाणी

पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी नगरसेवक नितीन सोनार, तर उपाध्यक्षपदी अशोककुमार लालवाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोना काळात जेव्हा व्यापारी हतबल झाले होते. कुठे ही त्यांची दखल घेतली जात नव्हती. त्यावेळी शहरातील तीन व्यापाऱ्यांनी ज्यात प्रामुख्याने अशोककुमार लालवाणी यांनी पुढाकार घेत अमृत कलेक्शनचे मालक केशवआण्णा क्षत्रिय व बजरंग जनरलचे विलास वाणी यांना सोबत घेत एका संघटनेची स्थापना करण्याची कल्पना सुचवली. तेव्हा या तिघांनी मिळून शहरातील दुसऱ्या व्यापाऱ्यांना सोबत घेऊन पारोळा व्यापारी महासंघाची स्थापना केली. वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करून व्यापार्यांची होत असलेली कुचंबणा शासन दरबारी मांडली यातून अनेक वेळा शासनाने ही याची दखल घेत व्यापाऱ्यांना सहकार्याची भावना दाखवली अश्या या पारोळा व्यापारी महासंघाची चार वर्षांनंतर पुनर्रचना करून नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.

यात शहरातील उद्योजक नितीन सोनार यांची अध्यक्षपदी तर अशोककुमार लालवाणी, मनोज जगदाळे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तर इतर कार्यकरीणीत कार्याध्यक्षपदी प्रतीक मराठे, सचिव मनीष पाटील, खजिनदार रोशन शहा यांच्यासह इतर कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

याप्रसंगी या संघटनेचे वरिष्ठ सल्लागार विलासवाणी मनोहर हिंदुजा, मा,अध्यक्ष केशव क्षत्रिय संजय कासार, दिनेश गुजराती, अरूण वाणी आकाश महाजन, सुनील भालेराव, मिंलीद विसपुते यांच्यासह शहरातील व्यापारी बाधंव उपस्थित होते. या निवडीने शहरात विविध राजकीय, सामाजिक, संघटनांच्या वतीने नविन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या.

Protected Content