यावल प्रातिनिधी । तालुक्यातील साकळी येथील रहिवाशी सोनाबाई सुर्यभान पाटील (वय-७८) यांचे आज दि.१३ सप्टेंबर रोजी वृद्धपकाळाने निधन झाले आहे.
सोनाबाई यांचे आज निधन झाले असून उद्या (दि.14) त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. सोनाबाई पाटील या भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य सुर्यभान हिरामण पाटील यांच्या पत्नी तर जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. मयत पश्चात पती, तीन मुले, सुन, चार मुली, जावई आणि नांतवडे असा परिवार आहे.