जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंपजवळ राहणाऱ्या एका खासगी शिक्षकाने राहत्या घरात सुसाईन नोट लिहून आजाराला कंटाळून गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना गुरूवार २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहूल आंबादास पाटील वय ३५ रा. बोरखेडा ता.धरणगाव ह.मु.गुजराल पेट्रोलपंप, जळगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील रहिवाशी राहूल आंबादास पाटील हे आपल्या पत्नी व आई यांच्यासोबत जळगावातील गुजराल पेट्रोलपंपाजवळ वास्तव्याला होता. ते शहरातील खासगी क्लासेस येथे शिक्षक म्हणून नोकरीला होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पोटाचा गंभीर आजार होता. त्यामुळे त्यांच्या पोटाची दोनवेळा शास्त्रक्रिया देखील झालेली आहे. दरम्यान, पोटाच्या आजारालाच्या सततच्या त्रासाला कंटाळून आपण गळफास घेत असून यात कुणालाही दोषी ठरवू नये असे सुसाईड नोट लिहून त्यांनी गुरूवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घरात कुणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केली. बाहेर गेलेली पत्नी घरात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. पतीला पहताच त्यांनी हंबरडा फोडला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.