जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली गावात राहणाऱ्या ५३ वर्षीय प्रौढ व्यक्तीने दुर्धर आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी १० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता मुलाच्या लक्षात आल्याने समोर आली आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लिलाधर गोविंदा खडसे वय ५३ रा. भादली ता. जळगाव असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली गावात लिलाधार पाटील हे आपल्या पत्नी आणि मुलगा यांच्यासह वास्तव्याला होते. गेल्या काही महिन्यांपासून लिलाधर पाटील हे दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवारी १० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता त्यांचा मुलगा गणेश हा झोपेतून उठल्यावर त्याला वडीलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. दरम्यान, त्यांना तातडीने खाली उतरवून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचरार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शशिकला आणि मुलगा गणेश असा परिवार आहे.