भाजपासह काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात : जयंत पाटील

jayant patil

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले तसेच काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.

 

पुण्यात राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठकीपूर्वी पत्रकारांशी जयंत पाटील यांनी संवाद साधला. यावेळी श्री. पाटील म्हणाले की, ५ ते २० आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांची नावं आत्ताच मी उघड करणार नाही कारण त्यांच्यासाठी ते अडचणीचे होईल. आम्ही मेगा भरती करणार नाही तर मेरिट भरती करु असेही पाटील यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, धगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे आदी उपस्थित आहेत.

Protected Content