जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात बुधवारी २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापौर जयश्री महाजन यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज नगरातील टी- आकाराचा रेल्वे उड्डाणपुल तातडीने पुर्ण करावा, प्रस्तावित ब्राम्हण सभा समोरील बोगद्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करावेत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम तातडीने पुर्ण करावेत, छत्रपती शिवाजी महाराज नगरातील स्वच्छतेचा प्रश्न तातडीने निकाली काढव्यात, याच परिसरातील रस्त्यांचे कामे लवकरात लवकर पुर्ण करावे, यासह प्रलंबित असलेल्या विविध मागण्या देखील तातडीने पुर्ण करावेत अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मागण्यांचे निवेदन महापौर जयश्री महाजन यांना देण्यात आले. याप्रसंगी विजय राठोड, जाहांगिर खान, योगीता शुक्ल, अकबर काकर, शारदा भावसार, दिलीप कोष्टी, रिना अहिरे, संगिता बडगुजर, पुजा येवले, भारती पवार, गीता फडके, दुर्गा मराठे, कमल चांदवारकर, प्रमिला चौधरी यासह छत्रपती शिवाजी नगरातील महिला व नागरीक उपस्थित होते.